ग्रामपंचायत डोंगारी

डोंगारी हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात (पूर्वी ठाणे विभाग होता, पण 1 ऑगस्ट 2014 मध्ये पालघर हा स्वतंत्र जिल्हा झाला) असलेले एक आदिवासी बहुल गाव आहे.
डोंगारी व तलासरी भागात वारली आदिवासी समाजाची दीर्घ परंपरा आहे. त्यांची समृद्ध वारली कला, निसर्गाशी जोडलेली जीवनशैली आणि सामाजिक संस्कृती आजही जिवंत आहे. शिक्षण व कौशल्य प्रशिक्षणामुळे गावाचा विकास होत असून नवीन रोजगार संधी निर्माण होत आहेत.

 

लोकसंख्येची माहिती

गावाची लोकसंख्या सुमारे १५६६ (२०११) आहे, ज्यापैकी जवळपास ७५% लोक अनुसूचित जमातीतील आहेत.
• मुख्यतः आदिवासी समुदायाचा भाग आहेत.
• गावात मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन संबंधित कामे आहेत, आणि लोकांचे जीवन साधे आणि निसर्गाशी सुसंगत आहे.

गावाचे ब्रीदवाक्य :-

“परंपरेमूळे, प्रगतीकडे वाटचाल.”
“श्रम, सन्मान आणि समृद्ध जीवन.”
“शिक्षणातून विकास, विकासातून उज्ज्वल भविष्य.”
“आदिवासी परंपरेचा अभिमान, आधुनिकतेची ओळख.

दृष्टी आणि ध्येय

परंपरा जपत शिक्षण, आरोग्य व रोजगारात स्वयंपूर्ण, निसर्गस्नेही आणि एकजुटीचे आदर्श डोंगरी गाव घडवणे हे या दृष्टी–ध्येयाचे मूळ उद्दिष्ट आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण व डिजिटल साक्षरता, स्वच्छता व आरोग्य सुविधा, स्थानिक रोजगार व आर्थिक विकास, पर्यावरण संवर्धन तसेच सांस्कृतिक जतन व सामाजिक एकता यांद्वारे शाश्वत व समृद्ध ग्रामविकास साध्य करणे हे प्रमुख ध्येय आहे.

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही0नाही
उपकेंद्र (Sub Center)होय12होय
अंगणवाडीहोय15होय
प्राथमिक शाळाहोय7होय
माध्यमिक शाळाहोय1होय
उच्च माध्यमिक शाळानाही0नाही
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही0नाही
समुदाय भवन (Community Hall)होय3होय
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय3होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय4होय
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय2होय
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय2होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत डोंगारी

बँकेचे नाव : ठाणे मध्यवर्ती बँक

शाखेचे नाव: तलासरी

अकाउंट नंबर : 006600300001597

आई एफ एस सी कोड :TDCB0000066

पत्ता : ग्रामपंचायत डोंगारी, ता. तलासरी, जि. पालघर